सोमवार, १८ मार्च, २०१३

मातीतले आम्ही

करपली पिकं सारी 
न्हाई जनावराले चारा 
जीव वारा हुरी व्हतो
पाहून रानच्या पाखरा 

व्हते अंगाची काहिल 
आटला गावचा पाणवठा 
न्हाई खायाले भाकर 
जीव झाला ग नकोसा 

माही लेकरं न गाय 
चार बकर्या न मोती वाघ 
कसं तगवु ग  त्याहिले
झोपडं ग माझं खाली सारं 

केला देवाले नवस 
हात जोडीले सायबाले
पाया पडले सरकारचे
भिक मागितली सावकाराले 

माही काळी माय 
भेगाळला ग जीव तिचा
आम्हीही आता किती दिस तगणार 
का जावू असेच संपून........
मातीतले आम्ही आमच्याच मातीत............ 

२ टिप्पण्या:

  1. वाचताना मनाला मनापासून यातना होतात आणि त्याच वेळी तुमच्या मनातून आलेल्या ह्या अर्तवाला सलाम करावासा वाटतो.
    खरे तर हे परिस्थिती डोळ्यांनी पाहिलेली / ली किवा स्वतः अनुभवलेलली/ ला कवयत्री/कवी इतक्या आर्ततेने लिहू शकते/तो असे मला तरी वाटते.

    उत्तर द्याहटवा