शनिवार, २० जुलै, २०१३

पुनर्जन्म

पुनर्जन्म म्हणजे मेल्यानंतर 
पुन्हा जन्म असतो का मला माहित नाही
पण याच जन्मात मी लेकीच्या जन्मात 
माझा पुनर्जन्म अनुभवते आहे………

तिचा निरागस गोड चेहरा 
यात मी माझे हरवलेले बालपण शोधत असते 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बरेच काही राहून गेलेले आहे  
पण तिच्या रुपात आम्ही पुन्हा सुखाचे क्षण अनुभवतो…………. 

तिच्या  आयुष्याच्या प्रत्येक वळणाची
मी सावली होऊन तिच्यासोबत असते 
माझे हरवलेले क्षण ती भरभरून जगते तेव्हा 
माझे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते……. 

तिच्या प्रत्येक यशाच्या पायरीसोबत 
माझ्या जीवनातील पराजय धुतला जातो 
अन मी पुन्हा पुन्हा नव्याने जगायला सिद्ध होते
एकाच जन्मात पुन्हा नव्याने जन्म घेते……  

तिचे रूप म्हणजे माझा अन तिच्या बाबांचा 
रूपाचा अन गुणांचा एकत्रित संगम 
आम्हा दोघांचे द्वैत जावून अद्वैताचा संगम  
आमच्या प्रेमाला परमेश्वराने दिलेली  देणगी  ……… 

खरंच परमेश्वर आहे हे तो 
प्रत्येक गोष्टीतून दाखवत असतो म्हणूनच  
तो आम्हाला आई बाबा बनवुन 
त्याचा  आम्ही अंश असल्याची प्रचिती देतो ……. 

माणूस खूप काही मिळवण्यासाठी धावत असतो
बाळ हवे म्हणून देवाकडे साकडे घालतो हरेक प्रयत्न करतो 
अन आयुष्याच्या एका टप्प्यावर तो आई किंवा बाबा होतो 
त्या ईश्वरीय अंशामुळे त्याला मातृ देव -पितृदेवाचा दर्जा मिळतो …

तो ईश्वरी अंश त्याच्या स्वतःपासून बनवून 
देवाने प्रत्येक सजीवावर किती मेहरबानी केली आहे
आपले बाळ प्रत्येकाला किती प्रिय असते 
कारण त्याला माहित असते कि याच्यामुळेच तर माझे जीवन आहे ………. 

नाहीतर मी जन्मलो वाढलो अन संपलो
मला काहीच अर्थ नाही 
कितीही धनसंपदा मिळवली तरी 
मी राहीन तरच याचा उपयोग…………… 

अन  बाळाच्या रूपाने 
मी जन्मोजन्मी जिवंत राहणार आहे
माझा मी पणा जपला जाणार आहे 
म्हणून मला मातृ-पितृदेव भव च्या जोडीला  कन्या-पुत्रदेव भव म्हणावेसे वाटते…….