मंगळवार, ५ मार्च, २०१३

स्वप्न परी

तिला पहिल्यांदा पहिले तेव्हा
तिला पाहताक्षणीच नजरेत भरली  
स्वप्न परी ती  खरीखुरीच
अर्धांगी बनून माझ्या आयुष्यात आली 

तिच्या सोबत मी स्वप्नात 
असल्यासारखा खुश होतो 
तीही माझ्यासोबत
बहरली  मोहरली फुलली 

अन आता तर दिवसेंदिवस 
तिचे रूप माझ्या नजरेत मावत नाही
माझ्या कवेत अलगद येनारी ती 
आजकाल माझ्या कवेतही मावत नाही 

कारण पूर्वी ती होती कळशी 
अन आता ती हंड्याची मावशी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा