मंगळवार, ११ जून, २०१३

नातीगोती

नातीगोती हवीहवीशी 
अन कधी नकोनकोशी 
ज्याच्याकडे  पैसा… सत्ता 
तो श्रेष्ठ  दर्जाचा बाकीचे  आपले नेहमीच नुसता गोतावळा 

पण  त्या गोतावळ्यातही 
प्रत्येकाला स्वतःचा  चेहरा असतो 
तोही आपली ओळख 
आपल्या परीने शोधतच  असतो 

श्रेष्ठ दर्जाचा म्हणवणारा
नातेवाईक कधी  पैशाने दाबतो 
तर कधी नात्याने दाबतो 
पण  मोठेपणाच्या अहंकारात तो बरोबरच असतो 


त्याची प्रत्येक कृती योग्य असते 
कारण तो मोठा असतो अन 
गोतावळ्यातला धडपडणारा होतकरू 
त्याचा हक्काचा  गुलाम असतो 

श्रमाची,हमालीची, मेहनतीची 
सगळी कामे त्याने करायची 
कारण त्याच्याकडे काय आहे 
इतके तर त्याने केलेच पाहीजे 

पैशावाला तो कधी
मोठा भाऊ कधी बहीणही असते 
नात्याचं मोठेपण त्यांना 
आयुष्यभर  मिरवायचे असते  

मोठेपण म्हणजे काय हे 
ते बरेचदा विसरतात 
अन लहानांनी लहानच राहावे
या हट्टाने  मग निसर्गतःच मिळालेले मोठेपण ते स्वतःच गमावतात  



  

1 टिप्पणी:

  1. नातीगोती हवीहवीशी
    अन कधी नकोनकोशी
    ज्याच्याकडे पैसा… सत्ता
    तो श्रेष्ठ दर्जाचा बाकीचे आपले नेहमीच नुसता गोतावळा
    Very true

    उत्तर द्याहटवा