गुरुवार, ९ मे, २०१३

अजूनही मी एकटाच


सांगायला तर ते आई बाबा होते
रथाची ती दोन चाके मात्र नेहमी एकमेकांचे 
विरूद्धच धावत होती अन
आम्हा पाखरांचे नशिबी फक्त हिंदकळणेच होते  

स्वर्गातली त्यांची गाठ 
पृथ्वीवर नेहमीच उलटी होती 
त्यांचे नेहमीचेच युद्ध वार मात्र
आम्हीच झेलत होतो 

दोधांच्या वागयुद्धाला 
घरचीच रणभूमी मिळाली होती
हरनाऱ्यालाही शस्त्र चालवायला 
आमची पाठ मात्र नेहमी हक्काची होती

दिवस बदलले, बदलले वारे 
प्रत्येक गोष्टीला मोहताज मी 
माझ्या कष्टाचे चीज झाले 
सर्व भौतिक सुख घरात आले 

माझ्या एकट्याचीही 
सुंदर चौकट झाली 
आता मात्र दोघांचेही एकमत आहे 
दोघांच्याही कष्टांमुळे???? माझे हे यश आहे 

आज मी भौतिक जगात यशस्वी अन सुखी? आहे 
मुलांसोबत आईबाबांचाही पालनकर्ता आहे 
जे हवे ते मिळवण्याची हिम्मत आहे 
असे सगळ्यांनाच वाटत आहे 

पण माझं होरपळलेले बालपण,तारुण्य
मी.....अजूनही एकटाच आहे 
कितीही अट्टाहास केला तरीही,
कितीही कष्ट केले तरीही मिळेल काहो मला ते निरागस,निर्मळ कोमल बालपण ......................
by Manaswi

1 टिप्पणी:

  1. khupach sundar kavita.

    .दोधांच्या वागयुद्धाला
    घरचीच रणभूमी मिळाली होती
    हरनाऱ्यालाही शस्त्र चालवायला
    आमची पाठ मात्र नेहमी हक्काची होती
    ...!

    balpani aai babchya anga khandyavar khelayache vay..... pan tyanchyatil sangarshache phatake.... pathivar zelun mothe zalele balapan...... aaushyachya uttrardhat.... tyachi yachana karate aahe.....! jivala chataka lavun gele he shabd.....! he anubhavlyashivay tyachi vedana itaki khari yeuch shakat anhi....!

    उत्तर द्याहटवा