बुधवार, ८ मे, २०१३

मी असा......मी तसा


जीवन जगताना बाहेरून कसेही वागलो तरीही 

अंतर्मनात एक द्वंद नेहमीच चालू असते 
ऐहिक जगात जिंकण्याच्याच उर्मीने जगणारे आम्ही 
आतमध्ये मात्र स्वतःला चांगलेच ओळखून असतो 

महागाई,बेकारी ,भ्रष्टाचार,बलात्कार 
सगळ्यावरच आम्ही पोटतिडकीने टिपण्या देतो
पण आतमध्ये डोकावून पहिले तर जाणवतं 
खरंच का टिपन्यांच्या एक टक्का तरी आम्ही जगतो ?

कधी कधी वाटते कशासाठी हा अट्टाहास 
आहोत तसेच व्यक्त व्हावे 
अन नंतर काय होईल ते पाहून घ्यावे
जे होईल त्याला सामोरे जावे  

पण स्वार्थीजीव तसे वागू देईल तर शपथ्थ 
क्षणभंगुर आयुष्याचे वाटेकरी आम्ही 
अमर असल्याप्रमाणे जगत असतो म्हणूनच तर
शेवटच्या क्षणापर्यंत मी असा मी तसा चा नारा चालूच असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा